By  
on  

नक्षलवादावरील एक्शन-थ्रीलर सीरीज ‘नक्सल’च्या शुटींगला होणार सुरुवात, राजीव खंडेलवाल प्रमुख भूमिकेत

 ‘झी5’ने ‘नक्सल’ या दमदार अॅक्शन-थ्रीलरमधील कलाकारांची घोषणा केली आहे. राजीव खंडेलवाल (राघव), टीना दत्ता (केतकी), आमीर अली (केसवानी), श्रीजीता डे (प्रकृती) आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार या मालिकेमध्ये दिसणार आहेत. या मालिकेच्या चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.

अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची मालिका काल्पनिक कथेवर अवलंबून असून यात ‘नक्सल’ चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा साकारण्यात आली आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून ‘नक्सल’ चळवळ या दोन्ही  वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे. 

“कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूपच ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यापैकी एकाहीबरोबर मी अद्याप काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. मला असे वाटते की माझ्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असेल, कारण त्यांनी आत्तापर्यंत मला यासारख्या व्याक्तीरेखेमध्ये कधीही पाहिलेले नाही. ‘एसटीएफ’ एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. असे उद्गार ‘‘नक्सल’’ मधील प्रमुख भूमिका साकारणारा राजीव खंडेलवाल म्हणतो.

‘‘नक्सल’’ लवकरच  ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive