By  
on  

अभिषेक बच्चन-नित्या मेनन दिसले Breathe Into The Shadows च्या टीजरमध्ये

अभिषेक बच्चन आता वेबमाध्यमात दिसण्यास सज्ज झाला आहे. Breathe Into The Shadows या सिरीजचं पोस्टर शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. या सिरीजचा टीजर नुकताच समोर आला आहे.अभिषेक आणि नित्या यात पॅरेंट्सच्या भूमिकेत आहेत. या दांपत्याची मुलगी बेपत्ता होते. या टीजरचं पोस्टर शेअर करताना अभिषेक बच्चन म्हणतो, ‘सगळं काही ठीक होतं, पण एक दिवस सगळं बदललं. तुम्हाला माहिती आहे का आमची सिया कुठे आहे?- आभा आणि अविनाश सब्रवाल’.

 

 

फादर्स डेला या सिरीजचा फर्स्टलूक समोर आला आहे. सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर ‘Breathe: Into The Shadows' Abundantia एंटरटेनमेंट द्वारा प्रोड्युस केलं जात आहे.  इन्सपेक्टर कबीर सावंतच्या लूकमध्ये अभिनेता अमित साध दिसतो आहे. याशिवाय सय्यामी खेरची महत्त्वाची भूमिका आहे. ही सिरीज 10 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive