By  
on  

‘भोसले’ च्या ट्रेलरमध्ये अभिनयाचं टशन, संतोष जुवेकर दिसला खास भूमिकेत

‘स्ट्रगलर साला’ नंतर अभिनेता संतोष जुवेकर पुन्हा एकदा वेबमाध्यमात जादू पसरवण्यास सज्ज झाला आहे. ‘भोसले’ या सोनी लिव्ह वरील सिनेमात तो झळकणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयी, अभिषेक बॅनर्जी, इप्शिता चक्रवर्ती हे कलाकार आहेत.  भोसले या सिनेमात मनोज वाजपेयी 60 वर्षांच्या सेवानिवृत्त कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर विलास ही भूमिका साकारत आहे. एका मराठी व्यक्तीच्या  भूमिकेत संतोष झळकणार आहे. 

 

 

तर अभिषेक आणि इप्शिता परप्रांतीयांच्या व्यक्तिरेखेत दिसत आहेत. भोसले हा कॉन्स्टेबल आपल्या आयुष्याची लढाई लढतानाच या परप्रातीयांना कसं वाचवतो ते या सिरीजमधून पाहता येणार आहे. हा सिनेमा येत्या 26 जूननंतर सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive