नाना पाटेकर आता साकारणार गुप्तहेराची भूमिका, दिसणार या वेबसिरीजमध्ये

By  
on  

नाना पाटेकर यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नाना गेले अनेक वर्षं स्क्रीनपासून लांब आहे. पण नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार नानाने एक वेबसिरीज साईन केली आहे. फिरोज नाडियाडवाला रामेश्वर नाथ काओ या गुप्तहेराच्या जीवनावर आधारित वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. नानाने यात मुख्य भूमिकेसाठी होकार दर्शवला आहे. रामेश्वर नाथ यांनी रॉची स्थापना केली होती. फिरोज यांनी लवकरच या सिरीजची घोषणा करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. 

20 एपिसोडच्या या सिरीजवर गेली पाच वर्षं काम सुरु आहे. यासोबतच लीडिंग सोशल प्लॅटफॉर्म्ससोबत याचं बोलणंही सुरु असल्याचं फिरोज यांनी सांगितलं आहे. काओ हे आय बी चे हेड होते. पण इंदिरा गांधी यांनी त्यांची नेमणूक रॉच्या अध्यक्षपदी केली. या सिरीजच्या शुटिंगला सुरुवात होणार असून त्यावेळी सर्व काळजी घेतली जाईल असंही फिरोज यांनी सांगितलं.

Recommended

Loading...
Share