By  
on  

Exclusive: हॉरर कॉमिक्स कॅराव्हॅन आता वेबसिरीज स्वरुपात येणार समोर

हॉलिवूडमध्ये कॉमिकवरून सिनेमा बनवणं हे नवीन नाही. पण भारतात मात्र हा ट्रेंड आताच रुजतो आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली सांगितलं होतं की, शमिक दासगुप्तांच्या एका नॉव्हेलवर संजय गुप्ता जॉन अब्राहमला घेऊन सुपरहिरो सिनेमा बनवणार आहे. 

आता दासगुप्ता यांच्या आणखी एका कादंबरीवर सिरीज बनणार आहे. ‘कॅराव्हॅन’ या कादंबरीवर मल्टी सीझन वेबसिरीज बनणार आहे. निर्माते विवेक रंगाचारी यांनी या कादंबरीचे हक्क विकत घेतले आहेत. अस्विन श्रीवतसंगम हे या सिरीजसाठी सहनिर्माते असणार आहेत. अजूनही या सिरीजसाठी लिडींग ओटीटी प्लॅटफॉर्मशी बोलणं सुरु आहे. या कॉमिक कंपनीने रक्षक या कॉमिक्सचे हक्क संजय गुप्ता यांना यापुर्वी विकले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive