By  
on  

'लिव इंडिपेंडंट' या नव्या कोऱ्या मराठी वेब सिरिजचा पाहा फर्स्ट लुक

सध्या वेबसिरीजचा जमाना आहे, त्यात मराठी कंन्टेट कसा मागे राहिल . वर्ष २०२०... पण अजूनही मुलींना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे का? प्रत्येक मुलीच्या जगण्यात एखादी व्याख्या शोधली जात आहे का? घरी  मनमोकळे वातावरण जरी असले तरी घराच्या बाहेर जी दुनिया आहे त्यात ती बिनधास्तपणे वावरू शकतेय का? कळत नकळतपणे समाजाचा विचार मुलींच्या प्रगतीच्या आड येतोय का? तिला हवं तसं ती जगतेय का? तिच्या मनासारखी मोकळीक तिला मिळतेय का? 'LIVE INDEPENDENT' असं मनाशी पक्क धरून अनेकांना उंच भरारी घ्यावीशी वाटते... आणि यात काय गैर आहे?

यांसारख्या असंख्य प्रश्नांवर प्रकाश टाकून, मुलींच्या दृष्टीकोनातून एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित 'लिव इंडिपेंडंट' (LIVE INDEPENDENT) ही नवी  वेब सिरिजच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.  नुकताच या वेब सिरिजचा मुहूर्त सोहळा इगतपुरी येथे पार पडला आणि पहिले वहिले पोस्टर देखील सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'ति'ची दुनिया, 'ति'चं आयुष्य, 'ति'ची इच्छा... पण 'ति'ला मिळतंय का 'ति'च्या मनासारखं जगायला? प्रत्येक मुलीसाठी तिच्या हक्काचे दोन शब्द 'LIVE INDEPENDENT' 'लिव इंडिपेंडंट', एक नवी कथा, नवी वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला @sainath_raja @uttungmarathi @filmyowlstudios *@mirajagga* @miss.snehalsalunke @tushar_ghadigaonkar @sumedhsk1895 @parag_sawant @suchitragosavi @harshala_7727 @rushikesh_zagade @divyaghag10 @rup_pawaskar @meankitshinde #LiveIndependent #WebSeries #Marathi #SainathRajadhyaksha #UttungMarathi #FilmyOwlStudios #Muhurt #MuhurtClap #MiraJagannath #SnehalSalunke #GirlsLiveIndependent #ComingSoon

A post shared by Uttung Marathi (@uttungmarathi) on

साईनाथ राजाध्यक्ष निर्मित 'लिव इंडिपेंडंट' चे दिग्दर्शन तुषार घाडीगांवकर हे करणार असून सुमेध किर्लोस्कर हे या वेब सिरिजचे लेखक आहेत. यामध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि स्नेहल साळुंखे या प्रमुख भूमिकेत दिसतील. उत्तुंग मराठी या यूट्यूब चॅनेलवर ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. पराग सावंत हे डीओपी आहेत. फिल्मी आऊल स्टुडिओझ हे प्रॉड्शन्सचे काम पाहणार आहेत.

'लिव इंडिपेंडंट' या वेब सिरिजचे पोस्टर पाहता आजच्या युथशी कनेक्ट करणारी इंटरेस्टिंग गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive