साडीत पूजा सावंत दिसतेय खुपच झक्कास, फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ

By  
on  

मराठी अभिनेत्री आणि त्याचं साडीप्रेम काही आपल्याला नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकतेच तिचे साडीतले ककाही अप्रतिम फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य देते. पण या सिल्कच्या साडीत मात्र ती खुपच खास दिसतेय.

 

या सिल्कच्या साडीवर पूजाने मोजकेच दागिने परिधान केले आहेत. पण या सिंपल लुकमध्ये पूजा डिंपल दिसतेय. तिच्या सौंदर्याला या साडीत चॉर चॉंद लागले आहेत. चाहत्यांनासुध्दा पूजाचं हे फोटोशूट खुप आवडलं असून त्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

पूजाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्रीसोबतच पूजा मोठमोठ्या फॅशन शोमध्ये शोस्टॉपर असते. 

सिनेरसिकांना पूजाच्या सिनेमांची नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. तिच्या सुपरहिट दगडी चाळ सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Recommended

Loading...
Share