By  
on  

PeepingMoon Exclusive: हरहुन्नरी अभिनेते निळू फुले यांच्या बायोपीकवर काम सुरु

हिंदी सिनेसृष्टी सध्या बायोपीकमधील व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारीत करताना दिसत आहे. विविध खेळाडू, राजकारणी, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यांच्यावर बायोपीक बनवल्यानंतर आता येत्या वर्षात फिल्ममेकर्स कलाकारांवर बायोपीक बनवण्याच्या विचारात आहेत. सध्यातरी जवळपास पाच चित्रपट हे सिनेसृष्टीतील कलाकारांवर आधारित बायोपीक आगामी काळात येण्याची प्रक्रिया सुरु आहे. नुकतीच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बायोपीकची घोषणा करण्यात आली होती. आता पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभाशाली लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्यावर बायोपीक येणार असल्याचं कळतय.
टीप्सी इंडस्ट्रीचे निर्माते रमेश तौरानी यांनी निळू फुले यांच्या बायोपीकसाठी अधीकार विकत घेतले आहेत. ते निळू फुले यांचा अभिनेता, स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते असा प्रवास या चित्रपटात दाखवणार आहेत. निळू फुले यांची मुलगी गार्गी निलकांत फुले यांच्याकडून हे हक्क मिळवण्यात आले आहेत. पुढील वरषी एका मराठी फिल्ममेकरसोबत मिळून या चित्रपटावर काम करण्यात येईल. तौरानी यांची ही दोन दशकातील दुसरी बायोपीक असेल. त्यांनी राजकुमार संतोषी यांच्यासोत द लेंजड ऑफ भगत सिंग बनवली होती. ज्यात अजय देवगण भगत सिंग यांच्या भूमिकेत झळकला होता.


निळू फुले यांची मराठी नाटक आणि चित्रपटातील एक महान अभिनेते म्हणून ओळख आहेत. 1930 मध्ये पुण्यातील एका गरीब कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्यापासून त्यांच्या करियरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1956 मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटापासून त्यांची चित्रपटसृष्टीत सुरुवात झाली होती. निळू फुले हे दृष्ट खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांचा अभिनय इतका उत्कृष्ट असे की महिलांना खऱ्या आयुष्यातही ते खलनायक वाटत असे.
त्यांचा भारदस्त आवाज आणि संवादकौशल्यासाठीही ते ओळखले जात होते. मराठी चित्रपटांमधील त्यांचे डायलॉग हे आजही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध डायलॉगपैकी एक आहेत. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ या चित्रपटातीलही त्यांचे काम उल्लेखनीय होते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’, दिलीप कुमार यांच्यासोबत ‘मशाल’, अनुपम खेर यांच्यासोबत ‘सारांश’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होत. चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे फुले हे खऱ्या आयुष्यात मात्र हिरो होते. विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा पुढाकार असायचा. अंधश्रद्धा निर्मुलन, आंतरजातिय विवाह, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ यांसारख्या गोष्टी त्यांचा सहभाग असे. 2
2009 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी निळू फुले यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायम घर करुन आहेत. तेव्हा निळू फुले यांचं आयुष्य चित्रपटातून कशा पद्धतिने समोर येईल, त्यांची भूमिका साकारणासाठी कोणता ताकदीचा अभिनेता हे शिवधनुष्य पेलेल  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive