June 20, 2021
'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सुरु झालीये लगीनघाई

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीवर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखतर... लग्नानंतर मुलीचे..... Read More

June 19, 2021
पाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. अनेक नवनव्या उत्कंठावर्धक वळणांनी ही मालिका रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. अनघाला डावलून अंकितासोबत संसार थाटण्याचा अभिने घेतलेला निर्णय कोणालाच पसंत..... Read More

June 17, 2021
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत उडणार सरु आणि सुर्याच्या लग्नाचा बार

स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत सध्या उत्सुकता आहे ती सरु आणि सुर्याच्या लग्नाची. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने त्यांचं लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच सहकुटुंब..... Read More

June 17, 2021
अभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा ?

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने नुकताच २५० भागांचा पल्ला गाठला. आता ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. एकीकडे अभ्याच्या मनात लतीबद्दल..... Read More

June 16, 2021
अंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा..... Read More

June 16, 2021
आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडली. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू..... Read More

June 16, 2021
टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली..... Read More

June 16, 2021
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत अनुभवायला मिळणार पिकनिकची धम्माल

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शिर्केपाटील कुटुंब सहलीसाठी निघालंय. खरतर जयदीप गौरीला हनिमूनला पाठवायचा माईंचा बेत होता. मात्र जयदीपच्या सांगण्यावरुन संपूर्ण कुटुंबच फिरण्यासाठी निघालंय. खास बात म्हणजे..... Read More

June 15, 2021
'गाथा नवनाथांची' या पौराणिक मालिकेत व्हीएफएक्सच्या मदतीने उलगडणार अनेक प्रसंग

कलियुगात जेव्हा  असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना  नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे.

काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.

        View this post on Instagram                      

Read More

June 15, 2021
‘जय भवानी जय शिवाजी’ या आगामी मालिकेत अजिंक्य देव साकारणार बाजीप्रभू देशपांडे

 ‘जय भवानी जय शिवाजी’ या आगामी मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव..... Read More