By  
on  

PeepingMoon Exclusive: शुभमंगल सावधान! रणबीर कपूर आणि आलिया भट अडकले विवाहबंधनात

बॉलिवूडचं गोड कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नसोहळ्याकडे तमाम देशवासियाचं लक्ष लागून राहिल आहे. दीपिका -रणवीर, प्रियांका-निक, विराट-अनुष्का आणि विकी-कतरिना यांच्यानंतरच रणबीर-आलिया हे सर्वात चर्चित कपल. कपूर घराण्याच्या या शाही लग्नसोहळ्याच्या प्रत्येक अपडे्ट्स जाणून घेण्याची चाहत्यांना खुप उत्सुकता आहे. 

कपूर आणि भट परिवाराच्या काही मोजक्या जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्र०परिवाराच्या उपस्थित रणबीर-आलिया यांनी नुकतेच सात फेरे घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हे बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल आता अधिकृतरित्या पती-पत्नी झाले आहेत. हा लग्नसोहळा वांद्रे येथील रणबीरच्या वास्तू अपार्टमेंटमध्ये पार पडतोय.  सूत्रांनुसार संध्याकाळी पती पत्नी म्हणून जाहीररित्या त्यांचा एक पब्लिक अपिअरन्स होणार असल्याचं  बोललं जात आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या तारखेवरुन बराच गोंधळ उडाला होता. अखेर ते दोघेही आज लग्नबंधनात अडकले आहेत.

आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ काल १३ एप्रिल ‘वास्तू’मध्येच पूर्ण विधींसह पार पडला. यावेळी संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive