By  
on  

PeepingMoon Exclusive: दाक्षिणात्य सुपरहिट Soorarai Pottru चा हिंदी रिमेक, झळकणार सुपरस्टार अक्षय कुमार

बॉलिवूडमधून पिपींगमून डॉट कॉमने एक जबरदस्त एक्सक्ल्युझिव्ह न्यूज वाचकांसाठी आणली आहे. एअर डेक्कनचे मालक कॅप्टन. जीआर.गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सोरराई पोटरुचा हिंदी रिमेक होतोय. या दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमात बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार झळकतोय. तमिळ भाषेतील या सुपरहिट सिनेमात साऊथ सुपरस्टार शिव कुमार झळकला होता. त्याचीच भूमिका अक्षय बॉलिवूडमध्ये करतोय. मागच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. लोकांना हा सिनेमा खुप भावला. करोनामुळे थिएटर्स बंद असल्याने निर्मात्यांनी हा सिनेमा एमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला होता. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही या सिनेमाला  प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं. 

या बहुचर्चित तमिळ सिनेमाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सुधा कोंगरा प्रसाद या हिंदी रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. तसंच साऊथ सुपरस्टार शिव कुमारच्या जागी अक्षय कुमार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

फिल्म 'सोरारई पोटरु' (Soorarai Pottru)ची ऑस्करसाठीसुध्दा निवड झाली होती. या सिनेमातील शिव कुमारच्या अभिनयाचंसुध्दा बरंच कौतुक झालं होतं. आता सर्वांनाच अक्षयला ह्या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये पाहण्याची उत्सुकता लागली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive