Peepingmooon Exclusive : रवी जाधव यांच्या पहिल्यावहिल्या हिंदी वेबसिरीज मध्ये झळकतेय सुश्मिता सेन

By  
on  

निर्माता आणि दिग्दर्शक रवी जाधव यांचे विविध चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारे ठरले आहेत. आता लवकरच रवी जाधव यांचं दिग्दर्शन असणारा 'टाइमपास ३' आणि निर्मिती असणारा 'अनन्या' हे मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान रवी जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

रवी जाधव लवकरच हिंदी वेबविश्वात पदार्पण करणार असून रवी जाधव दिग्दर्शित करत असलेल्या या हिंदी वेबसिरीज मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सुद्धा झळकणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रवी जाधव हे जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर या कलाकारांसोबत 'चिडिया उड' ही एक वेबसिरीज देखील दिग्दर्शित करत आहेत, त्यानंतर ते पुन्हा आता दुसऱ्या वेबसिरीजचंही दिग्दर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

रवी जाधव त्यांच्या दमदार ओटीटी पदार्पणात प्रेक्षकांसाठी काय काय घेऊन येणार आहेत यासाठी त्यांचे अनेक चाहते उत्सुक आहेतचं. सुश्मिता सेन यांची या वेबसिरीज मध्ये महत्वाची भूमिका असल्याने तमाम हिंदी प्रेक्षकांसह मराठी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Recommended

Loading...
Share