नवरंगोत्सव: चतुर्थीनिमित्त संजना फेम रुपाली भोसलेने शेअर केलं सुंदर फोटोशूट

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. 

यंदा आई कुठे काय करते ह्या मालिकेतील संजना म्हणून घाघरांत पोहचलेली अभिनेत्री रुपाली भोसले खास नवरात्री स्पेशल फोटोशूट चाहत्यांशी शेअर करतेय. आज नवरात्रौत्सवाची चतुर्थी. आजचा रंग लाल. रुपालीने लाल रंगातली जरीकाठीची सुंदर अशी साडी नेसून देवीुपातलं हे फोटोशूट शेअर केलं आहे. 

 

 

दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात रंगून जाण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व आहे. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या  दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते. 

 

देवीच्या रुपात संजना फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री रूपाली भोसले चाहत्यांची मनं जिंकतेय. 

 

 

 

 

रुपालीच्या ह्या खास नवरात्री स्पेशल फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Recommended

Loading...
Share