मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण , तिचं प्रत्येक पोटोशूट खासचं असतं.
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. नुकताच दसरा आनंदात साजरा झाला आहे तर दिवाळी आता लवकरच येतेय. या फेस्टिव्ह सीझनमध्ये सोनालीने नुकतंच कॉटनच्या कुर्ती आणि पायजमा अशा एथनिक लुकमधलं एक छानसं फोटोशूट शेअर केलं आहे.
भारतीय पोशाख परिधान करायला सोनालीला खुप आवडतं.
सोनाली जशी साडीत खुलून दिसते तशीच या एथनिक आऊटफिटमध्येसुध्दा गोड दितेय.
सोनालीच्या ह्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली तुम्हाला ह्या फोटोशूटमधून फेस्टिव्ह गोल्स देतेय.