By  
on  

शूटींगसाठी सोनाली कुलकर्णी सात समुंदर पार..

मराठी सिनेसृष्टीतली एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी सोबतच बॉलिवूडमध्येसुध्ददा सोनालीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळते. 
 

सोनालीने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ह्यात सोनाली एअरपोर्टवर असल्याचं कळतंय, तसंच आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी ती लंडनला रवाना होत असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलंय. 
 

एअरपोर्टवर मास्क परिधान केलेले आणि लगेजसोबतच्या फोटोंना सोनालीने 'सात समुंदर पार.... 'असं कॅप्शन दिलं आहे. 
सोनाली कुलकर्णीच्या या एअरपोर्ट डायरीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

 

 

पण सोनाली ज्या सिनेमाच्या शूटींगसाठी लंडनला रवाना झाली हे, तो सिनेमाबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. मराठी सिनेमा आहे की बॉलिवूड याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

 

मागच्यावर्षी सोनाली कुलकर्णीने सलमान खानच्या भारत सिनेमातून दमदार भूमिका साकारत चाहत्यांची मनं जिंकली होती, आता तिच्या ह्या आगामी प्रोजेक्टची सर्वांनाच आतुरता आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive