By  
on  

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली लग्नबेडीत, पाहा फोटो

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत बेळगाव येथे लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोसल मिडीयावर सईच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत होती. जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. 

 

 

 

आज  सोमवारी ( ३० नोव्हेंबर) सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला. दरम्यान, सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. त्यामुळे आधी ओळख, मैत्री आणि मग प्रेम असा टप्पा पार करत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive