By  
on  

मानसी नाईकने वाढदिवशी दिली प्रेमाची कबुली, शेअर केला प्रियकरासोबतचा फोटो

मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घयाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईकचा आज वाढदिवस. म्हणून तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. पण तिने मात्र एक बातमी देऊन चाहत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुऴे वाढदिवसाच्या शुभेच्छांसह मानसीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mood 2020 : 12 New Chapters 365 New Chances ️ #Queen #Actor #Performer #ExcitedForANewTravel

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

वाढदिवशी मानसीने आपल्या चाहत्यांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. यासोबतच तिने प्रियकर परदीप खरेरासोबतचा फोटोसुध्दा पोस्ट केला आहे. परदीप हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून तो प्रसिध्द मॉडेलसुध्दा आहे. 

दिलखेचक नृत्याने अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईकचा आज वाढदिवस आहे. मानसीचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतात दोन महत्त्वाची गाणी ती म्हणजे ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’. आज मानसीने प्रेमाची कबुली दिल्याने नेटक-यांमध्ये चर्चाला उधाण आलं आहे. इतकंच काय तर सिनेसृष्टीतही दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्वांनाच आता ही जोडी यंदा बोहल्यावर चढणार का याचे वेध लागले आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive