By  
on  

अभिनेत्री मानसी नाईकचा बॉयफ्रेंडसोबत क्वालिटी टाईम क्वारंटाईन

सध्या लॉकडाउनच्या या काळात आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. त्यातच काही हा वेळ कुटुंबासोबत घालवत आहे तर कुणी या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विविध गोष्टी  करत आहेत. अभिनेत्री मानसी नाईकही या लॉकडाउनमध्ये घरातच आहे. 

मानसी नाईक या वेळेत तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत वेळ घालवतेय. सोशल मिडीयावर सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. टिक टॉक या ऐपवरही मानसीचे प्रचंड व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. शिवाय आता मानसी आणि प्रदीपचे एकत्र व्हिडीओही चर्चेत असतात. सध्या मानसी हा क्वारंटाईन टाईम प्रदीपसोबत घालवतेय. सध्या मराठी इंडस्ट्रीमधील चर्चेत असलेलं हे कपल आहे. त्यातच प्रदीपने मानसीसोबतचा एक नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरही सोशल मिडीयावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

मानसी नाईकने तिच्या वाढदिवसाला याचवर्षी प्रेमाची कबुली दिली होती. सोशल मिडीयावर प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट करत ती प्रेमात असल्याचं तिने सांगीतलं होतं. प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. शिवाय मानसीलाही आपला बॉयफ्रेंड भारतासाठी खेळत असल्याचा अभिमान आहे.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive