By  
on  

पुष्कर जोगने शेयर केल्या त्याच्या या सिनेमाच्या सेटवरील आठवणी

लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. कुणी त्यांचे जुने फोटोशूट पोस्ट करत आहेत करत आहेत तर कुणी शुटिंग सेटला मिस करतय. यातच अभिनेता पुष्कर जोग त्यांच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. म्हणूनच त्याने या सिनेमाच्या आठवणी शेयर केल्या आहेत.

‘वेल डन बेबी’ हा पुष्कर जोगचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानच्या आठवणी पुष्करने शेयर केल्या आहेत. त्याने एक व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये पुष्करने बिहाईंड द सीन क्षण शेयर केले आहेत. यात शुटिंगच्या दरम्यानची मस्ती, शुटिगंचा शेवटचा दिवस, अमृता-पुष्करची मस्ती या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. 12 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असं पोस्टमध्ये लिहीलेलं असलं तरी सध्या लॉकडाउनमुळे या सिनेमाचं भविष्य काय असेल हे लवकरच समोर येईल. मात्र हे कलाकार या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive