सागर कारंडेने शेअर केला ‘चला हवा येऊ द्या’मधला तो तीन वर्षांपूर्वीचा फोटो

By  
on  

काय मंडळी हसताय ना ...हसायलाच पाहिजे असं म्हणत, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमामुळे यातील विनोदवीरसुध्दा प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत.

विनोदवीर सागर कारंडेसुध्दा रसिकांच्या प्रचंड लाडका आहे. या शोमुळे त्याची नानाविविध रुपं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी सागर साकारत असलेली पुणेरी बाई प्रसिध्द तर आहेच याशिवाय ती  नेहमीच धम्माल उडवून देते. पण सागरने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील तीन वर्षांपूर्वीचा आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

3 years ago...Chyd..#zeemarathiofficial #chyd

A post shared by Saagar Karande (@saagarkarande) on

 

स्त्रीच्या वेशातील सागरच्या या फोटोला चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय. ‘स्त्री पात्र तुम्ही आम्हा स्त्रियांनाही लाजवले इतकं सुंदर वठवता’, अशा शब्दांत एका महिलेनं कौतुक केलं . तर काहींनी तुम्ही कमाल आहात, तुम्हीच का त्या सागरिका मॅडम अशा धम्माल प्रतिक्रीयासुध्दा दिल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share