PeepingMoon Exclusive: करिना कपूर खान पुन्हा गुड न्यूज देणार अशी कुजबूज आहे !

By  
on  

सध्या करोना संकट आणि त्यात लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर अनेक संकटांचा डोंगर कोसळला. सर्वत्र एक मरगळच आलेली आपण पाहिली. पण आता अनलॉकमध्ये पुन्हा सर्वजण नवी भरारी घेण्यासाठी सज्ज जालो आहोत. नव्या जोमाने आपण कामाचा श्रीगणेशा करतो आहोत. संपूर्ण कलाविश्वसुध्दा पुनव्याने आपल्या भेटीस येत आहे. पण याच दरम्यान पिपींगमून डॉटकॉमच्या हाती एक गोड बातमी आली आहे. 

पिपींगमून डॉटकॉमला एका खात्रीशीर सूत्राने दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, अभिनेत्री करिना कपूर खान ही आपल्या दुस-या बाळाच्या आगमनाची तयारी करत असल्याचं समजतंय. यापूर्वीच करिना कपूर खान हिने अक्षय कुमार सोबत करण जोहरच्या गुड न्यूज या सिनेमातून धम्माल उडवून दिली होती. आता ख-या आयुष्यात ती तैमूरसाठी नवं भावंडं घेऊन येतेय. 

सूत्रांच्या माहितीनुसार करिनाच्या या गोड बातमीबद्दल फक्त तिच्या कुटुंबियांना आणि जवळच्या मित्र-परिवारालाच माहिती आहे. ते सर्वजण यासाठी खुपच उत्साहित असल्याचं कळतंय. तसंच बेबी बम्प दिसण्यापूर्वी करिनाला आमिर खानसोबतचा तिचा सिनेमा  'लाल सिंह चड्ढा' चं सर्व शूटींग पूर्ण करुन घ्यायचं आहे. 

 

 

करिनाला इंडस्ट्रीत २० वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ती ४० वर्षांची होईल. २००० साली तिने अभिषेक बच्चनसोबत रेफ्युजी या सिनेमाद्वारे आपल्या अभिनय कारकि्दीची सुरुवात केली होती. 

Recommended

Loading...
Share