Video : अरुंधती परत घालणार का तिचं मंगळसूत्र...?

By  
on  

‘आई कुठे काय करते' ही सर्वांचील लाडकी मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचलीय. संजना व अनिरुध्दचं कटू सत्य अरुंधतीसमोर आलं आहे, त्यामुळेच या धक्क्यातून सावरलेली अरुंधती आता पुन्हा ताठ मानेने अनिरुध्दसमोर उभी ठाकलीय. नानाविविध प्रश्न विचारुन तिने त्याला घेरलं आहे. 
पण अरुंधतीच्या कुठल्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अनिरुध्दकडे नाहीत, त्यामुळे आता अरुंधतीने तिच्या आयुष्यातून अनिरुध्दला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अरुंधती तिच्या निर्णयावर ती ठाम आहे.वेळप्रसंगी घरंही सोडायची अरुंधतीची तयारी आहे. अजून आई-आप्पांना आपल्या या मुलाच्या कामगिरीबद्दल काहीच माहित नाहीय, ते अनिरुध्दनेच त्यांना सांगावं अशी अरुंधतीची मागणी आहे, पण ती अनिरुध्दने झिडकारुन लावलीय.

दरम्यान, घरात मंगळसूत्राविना फिरणा-या अरुंधतीला सासूबाई मोकळा गळा बरा दिसत नाही म्हणून देवा-ह्यात ठेवलेलं मंगळसूत्र घालायला सांगतात, तितक्यात त्या अनिरुध्दलाच ते मंगळसूत्र अरुंधतीच्या गळ्यात घालायला देतात, आता अरुंधतीने इतके कठोर निर्णय घेतल्यानंतर ती हे मंगळसूत्र घालणार का, आई-आप्पांना अनिरुध्दचे प्रताप समजणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अरुंधती घालणार का तीच मंगळसूत्र परत ?!

A post shared by आई कुठे काय करते (@aai_kuthe_kay_karte_official) on

 

 

Recommended

Loading...
Share