नवरात्रौत्सवानिमित्त 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर नारीशक्ती विशेष भाग , पाहा Video

By  
on  

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर सेलिब्रिटी गायक दर आठवड्याला आपल्या सुरेल स्वरांनी ही गाण्यांची मैफील सजवतात. त्यांच्या स्वरांनी रसिक प्रेक्षक घरबसल्या मंत्रमुग्ध होऊन जातात. सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि मंगलमय-भक्तीपूर्ण वातावरण आहे, म्हणूनच यावेळेस सिंगीग स्टारच्या मंचावर सादर होणार नारीशक्ती विशेष. या निमित्तानं सोनी मराठी वाहिनीच्या लाडक्या नायिका म्हणजेच अश्विनी कासार, अलका कुबल आणि भार्गवी चिरमुले या कार्यक्रमात दिसणार आहेत.

या वेळी आस्तादनी 'नसतेस घरी तू जेव्हा' गाणं सादर केलं आणि त्याला अश्रू अनावर झाले. सर्व स्पर्धकांनी मिळून दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरतीही सादर केली. स्वानंदीनंही आपल्या ठसकेदार आवाजात उगवली शुक्राची चांदणी ही लावणी गायली आहे. ज्यासाठी तिला प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. 

 

पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' शुक्रवार-शनिवार रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

 

Recommended

Loading...
Share