By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'ची गौरी जेव्हा शिनचॅनच्या आवाजात बोलते तेव्हा...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही जयदीप आणि गौरीची हळूवा फुलत जाणारी कहाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. कोल्हापुरातील शिर्के-पाटलांच्या घरातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्याची रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. मालिकेत संपूर्ण घराची काळजी घेणारी आणि सतत जयदीपच्या सुखाचा विचार करणारी साधी-भोळी गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

पण ख-या आयुष्यात मात्र अभिनेत्री गिरीजा प्रभू खुप धम्माल-मस्ती करते. याचाच पुरावा म्हणून खुद्द गिरीजानेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' च्या सेटवरचा हा अफलातून व्हिडीओ शेअर केला आहे. गिरीजा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना माहित असलेल्या शिनचॅन या प्रसिध्द कार्टूनचा आवाज गिरीजाने अंगदी तंतोतंत काढला आणि सेटवर एकच हशा पिकला. 

 

 

मालिकेत नेहमीच भोळी-भाबडी आणि रडूबाई म्हणून वावरणा-या गिरीजाचा हा BTS व्हिडीओ पाहून चाहते मात्र चांगलेच चक्रावून गेले असणार यात शंका नाही.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive