By  
on  

अलका कुबल यांनी प्रोमो शेअर करत केलं मालिकेत वीणाचं स्वागत

प्राजक्ता गायकवाडची मुख्य भूमिका असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. प्राजक्ता सेटवर नखरे करणं, शुटिंग ऐवजी इव्हेंट्सना वेळ देणं, मेक अप रुममधून लवकर बाहेर न येणं हे प्रकार सातत्याने करत होती. त्यामुळे सेटवरील वागण्याला कंटाळून अलका कुबल यांनी तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. 

 

 

तिच्या जागी आता वीणा जगतापची निवड करण्यात आली आहे. अलका कुबल यांनी वीणाच्या एंट्रीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अलका म्हणतात, ‘ सकारात्मकतेसोबत नवीन सुरुवात. वीणा जगताप तुझं स्वागत आहे. सहकार्यासाठी आभार.’ आता आर्याच्या भूमिकेतील वीणा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करते का ते लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive