By  
on  

सोहमच्या वागण्याच्या वरचढ ठरला अभिजीत राजेंचा त्याग, पाहा व्हिडियो

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत आता हटके वळण येऊन ठेपलं आहे. सतत विचित्र वागण्याची हद्द करणारा सोहम आता सर्व सीमा पार करताना दिसत आहे. गरीब परिस्थितीवरून आसावरीला बरचं सुनावणा-या सोहमच्या नावावर अभिजीत राजेंनी सगळी संपत्ती केली आहे. 

 

 

संपत्ती नावावर होताच सोहमने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्याने अभिजीत राजेंना पायाशी झुकवण्याचा प्रयत्नही केला आहे. पण आसावरीवर नितांत प्रेम असणारे अभिजीत राजे ते नाकारतात. आसावरीवर त्यांचं नितांत प्रेम असल्याचं कबुल करत तिने साथ द्यावी अशी विनंतीही करतात. आसावरीही या होकार देत अभिजीत राजेंची साथ देण्याचं कबुल करते.  आता यावर सोहमची प्रतिक्रिया काय असेल ते लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive