By  
on  

नवी मालिका: सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘सांग तू आहेस का?’

‘जीवलगा’ नंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आता ‘सांग तू आहेस का?’  या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. प्रेमाचा अ‍ॅंगल असलेला पण काहीसा गुढ वाटणारा असा आहे. वैदेही आणि स्वराज या या जोडप्याची ही गोष्ट आहे.

 

 

वैदेही आता या जगात नाही. पण स्वराजला मात्र अजूनही तिचा वावर जाणवतो आहे. हा भास असेल की आणखी काही हे मात्र मालिका सुरु झाल्यावरच कळेल. ही मालिका 7 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive