शनायाने दाखवली अशी हुशारी की के डीचा डाव पडला त्याच्यावरच भारी

By  
on  

माझ्या नव-याची बायको मालिकेत आता एक हटके ट्रॅकवर आहे.  राधिकाला आता सोबत मिळाली आहे ती शनायाची. या मालिकेत गुरुनाथ सुभेदारच्या बदफैली वागण्यामुळे आयुष्याला नवीन सुरुवात केलेल्या राधिकाच्या आयुष्यातही त्याच्यामुळे अनेकदा अडचणींनाही तोंड देताना दिसत असे. 

 

 

पण लॉकडाऊननंतर सुरु झालेल्या मालिकेच्या नवीन भागांमध्ये हटके ट्वीस्ट येताना दिसत आहे. शनायाकडून सत्य वदवून घेण्यासाठी केडी एक योजना आखतो. पण यात शनाया अडकण्याऐवजी तो स्वत:च अडकतो. गुरुनाथ सध्या मायासोबत प्रेमाचे चाळे करत आहे. त्यामुळे चिडलेल्या शनायाने त्याला चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता आता राधिका आणि शनाया मिळून गुरुनाथला कसा धडा शिकवतात हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share