सोहमचे विचार ऐकून चढला अभिजीत राजेंचा पारा, पाहा व्हिडियो

By  
on  

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत रोज बबड्याच्या नवनवीन करामती ऐकायला मिळतात. उद्दाम बबड्या स्वत:च्या आईचा अपमान करतोच पण अनेकदा शुभ्रालाही त्याच्या स्वभावाचा त्रास सहन करावा लागतो. आताही त्याने असंच काहीसं केलं आहे. शुभ्राला प्रमोशन मिळाल्याचं ती घरी सांगते. पण बबड्याला मात्र तिचं हे प्रमोशन सहन न होऊन तिला बरंच काही सुनावतो. याशिवाय जबाबदारीची कामं बायका करू शकत नाही असा टोलाही लगावतो. 

 

 

त्याचे हे बोल ऐकून अभिजीत राजेंचा पारा चढतो. अभिजीत राजे त्याच्या या विचारसरणीबाबत खडे बोलही सुनावतात. महिलांबाबत असे संकुचित विचार असलेली व्यक्ती अभिज किचनची मालक होऊच शकत नाही असंही सुनावतात. त्याव्र पुन्हा एकदा सोहम चिडून निघून जातो. आता सोहम आणि अभिजीत राजेंमध्ये यावरून पुन्हा काय रणकंदन पेटणार हे कळेलच.

Recommended

Loading...
Share