'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेतील ह्या कलाकाराचे निधन

By  
on  

स्वराज्य घडवणाऱ्या मुलुखावेगळ्या आईची गाथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. अल्पावधितच ह्या ऐतिहासिक मालिकेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु नुकतंच या मालिकेच्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक दु:खद बातमी समोर येत आहे.

मालिकेत वीर बाजी घोरपडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत लोखंडे यांचं निधन झालं आहे. हदयविकाराच्या झटक्याने काल सोमवारी प्रशांत यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर संपूर्ण मालिकेच्या टीमकडून आणि सोनी मराठी वाहिनीकडून शोक व्यक्त केला जात आहे.

Recommended

Loading...
Share