म्हणून शुभ्राने केलाय मंगळसूत्राचा त्याग, पाहा व्हिडीओ

By  
on  

बबड्याची बबडेगिरी सुरुच आहे. तो काही सुधारायचं नाव घेत नाहीय. त्याच्यापुढे आत्ता अभिजीत राजे आणि शुभ्रानेही हात टेकलेत. लहानपणी बाबा गेले म्हणून कष्ट करुन बबड्याला लहानाचं मोठं करणारी आसावरी नेहमीच त्याच्या चुका पदरात घालते. आईला आपल्या मुलाच्या चुका कधीच दिसत नाही असं म्हणतात,आईच प्रेम हे आधंळ असतं. त्यामुळे बबड्याने मांडलेला मनमानी कारभाराच्या उच्छादाला चाप काही बसतच नाही. 

शुभ्राला तिच्या ऑफीसमध्ये प्रोमोशन मिळाल्याने ती प्रचंड आनंदी असतानाच सोहमच्या आतला पुरुष जागा झाला आणि त्याने तिच्या आनंदावर विरजण घातलंय. प्रोमोशन घेण्याची गरज नाही, असं म्हणत त्याने स्त्रियांचा अपमानसुध्दा  केलाय. या अपमानाचा शुभ्राला प्रचंड राग आला. अशा माणसाची पत्नी असल्याची तिला लाज वाटतेय,म्हणूनच तिने मंगळसूत्राचाच त्याग करायचा निर्णय घेतलाय. 

आता शुभ्रा हे मंगळसूत्र तेव्हाच घालणार जेव्हा बबड्याचा सोहम होणार आहे. मालिकेतल्या या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना आता अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या पुढील भागंची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिकांनी ‘अग्गंबाई सासूबाई’  ही मालिका सजली आहे. 

Recommended

Loading...
Share