प्राजक्ता माळीच्या घरी गोड चिमुकलीचं आगमन, शेअर केले क्युट फोटो

By  
on  

 सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच आपल्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाल्याची आनंद वार्ता चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच भाचीचे गोंडस फोटोसुध्दा तिने पोस्ट केले आहेत.

 

प्राजक्ता पुन्हा आत्या झाली आहे. तिच्या दादा-वहिनीला दुस-यांदा कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे.

 

 

 

 

पहिल्या भाचीचं नाव प्राजक्ताने याज्ञसेनी ठेवलं होतं, आता या गोड चिमुकलीचं हंसिनी असं नामकरण तिने केलं आहे. प्राजक्ताचं मुळातच संस्कृत नावावर नितांत प्रेम असल्यामुळे तिने भाची कंपनींच्या नावांसाठी या नावांना पसंती दिली आहे. 

 

 

 

 

 

प्राजक्ता पुन्हा आत्या झाली म्हणून  सिनेवर्तुळातून आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. 

Recommended

Loading...
Share