गावात चार समवयस्क टाळकी जमली की रंगतो लगोरीचा खेळ. सूरसपाटामधील या गाण्यात असच खेळ रंगला आहे. या गाण्यातील खेळ पाहून प्रत्येकालाच लहानपणाची आठवण होईल यात शंका नाही. 'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारं झालं आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे.
लाडे ब्रोज् फिल्म्सचा ‘सूर सपाटा’ हा दुसरा चित्रपट असून या आधी त्यांनी ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीयपुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यशकुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्येआपल्याला पहायला मिळतील.
https://www.youtube.com/watch?v=YxVfWsvPpLg