Photos : सई ताम्हणकरचे हे नो मेकअप लूक तुम्ही पाहिलेत का?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसचे तर कधी मजा-मस्तीचे पोस्ट ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिचे विविध स्टायलिश फोटोशूट इन्स्टाग्रामवर पाहणं म्हणजे एक पर्वणीच ठरते. पण सईने नुकतेच तिचे नो मेकअप लूकमधील काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. 

यामध्ये सईचा  व्हाइट टीशर्टमधील हा  नो मेकअप लूक उठून दिसतो आहे. सईचा हा मूड तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा ठरतोय ह्यात शंका नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mood !

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

 

 

 'धुरळा' हा सईची महत्त्वपू्र्ण भूमिका असलेला मल्टिस्टारर सिनेमा यंदा जानेवारीत प्रदर्शित झाला. या सिनेमातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली आहे. लवकरच तिचा 'पाँडिचेरी' हा   सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा आयफोनवर चित्रित होणारा पहिला मराठी सिनेमा आहे. याशिवाय 'मिडीयम स्पायसी' हा सईचा सिनेमासुध्दा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

 

सई लवकरच  कृती सेनॉनं सोबत ‘मिमी’ या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. हा सिनेमा मराठीतील ‘मला आई व्हायचंय’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या सिनेमात सई महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय, त्यामुळे चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

 

Recommended

Loading...
Share