नागराज मंजुळेंच्या सैराट फेम सिनेमातील आर्चीची क्रेझ अजूनही ओसरलेली नाही. अजूनही सर्वांना आर्चीॉची एक झलक पाहण्याचं वेड लागलंय. या सिनेमामुळे आर्ची एका रात्रीत स्टार झाली आणि प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. पण याचा त्रास आर्ची साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला होतोय. तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे रिंकू ही यंदा 12 वीची परिक्षा देत आहे.रिंकू ही सोलापुरातील टेंभूर्णीच्या जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. यावेळी येथे तिच्या फॅन्सची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी या कॉलेजच्या प्राध्यापकांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/Bt9MWUvBH7S/
तिने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. या परीक्षेत ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली होती.
रिंकूच्या आगामी सिनेमाविषयी बोलायचे झाले तर ती 'कागर' या मराठी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. तिची बारावीची परीक्षा असल्याने या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/BqCUl2wBaTf/