By  
on  

अभिनय बेर्डे बनला फिटनेस फ्रीक, जिममधला व्हिडिओ केला शेअर

ती सध्या काय करते या आपल्या पहिल्याच सिनेमातून तरुणींच्या हृदयात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. गोंडस चेहरा आणि स्टायलिश अंदाज यामुळे अभिनय आजच्या तरुणाईचा चेहरा वाटतो. अभिनय लूक इतकाच फिटनेसबद्दलही कमालीचा जागरुक आहे. अलीकडेच त्याने सोशल मिदियाव्र जीमिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो ट्रेनरच्या मदतीने घाम गाळताना दिसून येत आहे. अभिनयने हा जिमिंगमधला व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना फिटनेस गोल्स दिले आहेत. अभिनय सध्या त्याचा आगामी ‘अशी ही आशिकी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात तो अभिनेत्री हेमल इंगळेसोबत झळकणार आहे. स्वयम आणि अमरजा अशा दोन यंगस्टर्सची ही लव्हस्टोरी आहे. तरुणाईला ‘कपलगोल्स’ देणारा हा सिनेमा एक मार्चला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.instagram.com/p/BuBzhsQgze3/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive