By  
on  

शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरची नवी मालिका लवकरच

रात्रीस खेळ चाले भाग २ ही  मालिका ख-या अर्थाने गाजली ती अण्णा-शेवंता यांच्या केमिस्ट्रीमुळे. आपल्या मादक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलीय. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अपूर्वाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे, रात्रीस खेळ चाले- २ या मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुे चाहते शेवंताला प्रचंड मिस करतायत. पण अजिबात हिरमुसून जाऊ नका. शेवंता फेम अपूर्वा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर चाहत्यांच्या भेटीला येतेय. तीसुध्दा नव्या रुपात. 

 

 

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे.

 

झी युवा वाहिनीवरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

 

या नव्या रुपातसुध्दा अपूर्वा चाहत्यांना घायाळ करणार यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे चाहते आता पुन्हा एकदा अपूर्वाला नव्या  मालिकेत पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive