By  
on  

Video : हे मराठमोळे विरुष्का तुम्हाला कसे वाटले?

भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलकडे गोड बातमी आहे हे सर्वांनाच माहितीय. विरुष्काच्या या गोड बातमीमुळे अवघ्या देशातूनच नाही तर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण तुम्हाला माहितीय का अनुष्का आणि विराट हे जर मराठीत अवतरले तर कसे दिसतील कसे वागतील... नाही ना...समजत काही...अहो मग टेन्शन नॉट भाडीप या प्रसिध्द ओटीटी प्लॅटफॉर्मने तुमचा हा प्रश्न सोडवलाय केव्हाच. 

अनुष्का शर्माच्या रुपात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि विराट कोहलीच्या रुपात अभिनेता सिध्दार्थ मेनन ही मराठमोळी विरुष्काची जोडी पाहून तुम्हीही खखळून हसाल यात शंका नाही. विरुष्काच्या घरात आता नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा सुरु असणा आहे, याचा हा धम्माल व्हिडीओ प्राजक्ता आणि सिध्दार्थने सादर केला आहे. 

 

चाहत्यांनी ह्या मराठमोळ्या विरुष्काच्या भन्नाट व्हिडीओवर धम्माल कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ नक्कीच आवडेल.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive