By  
on  

या कारणासाठी लतादीदींनी केलं सुबोध भावेचं खास कौतुक, वाचा सविस्तर

रवी जाधव दिग्दर्शित आणि सुबोध भावे अभिनीत मराठीतील सुपरहिट सिनेमा बालगंधर्व हा आजही तमाम मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहे.
 नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते –गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळात स्त्रियांना अभिनय करण्यास बंदी होती, त्या काळात बालगंदर्व स्त्री पात्र हुबेहूब रंगवत रसिकांची दाद मिळवत. याच नटवर्यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. 2011मे महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. 

 

बालगंधर्व या सिनेमाला आत्तापर्यंत अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.परंतु या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठी कौतुकाची थाप बालगंधर्व सिनेमाच्या टीमला आता इतक्या वर्षानंतर मिळाली आहे आणि दस्तुरखुद्द भारताची गानकोकीळा लतादीदी यांच्याकडून . 

 

लतादीदींनी नुकताच बालगंधर्व हा सिनेमा पाहिला आणि ट्विट करत सिनेमाचं कौतुक केलं आहे. लतादीदी ट्विटमध्ये लिहतात,” मी आज पहिल्यांदाच बालगंधर्व हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा संगीत नाटकांचे महान कलाकार बालगंधर्वांच्या जीवनावर आधारित आहे. मी माझ्या आयुष्यात बालगंधर्व यांना दोन-ते तीन वेळा भेटले आहे. ते नेहमीच माझ्याशी आपुलकीने वागत. मला आर्शिवाद देत. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीसाठी मी त्यांना शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. तेव्हा त्यांनी तिथे दोन भजनंही गायली. हा सिनेमा पाहताना तो संपूर्ण काळ माझ्यासमोर उभा राहिला. हा सिनेमा खुपच अप्रतिम आहे. ह्यात बालगंधर्व यांच्या जीवनातील ज्या गोष्टी मला माहित नव्हत्या त्या या सिनेमामुळे समजल्या. बालगंधर्व यांच्या भूमिकेतील सुबोध भावेचं आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणा-या आनंद भाटे यांच्यासह संपूर्ण सिनेमाच्या टीमचं मी खुप खुप अभिनंदन करते. “

 

 

 

लतादीदींची ही पोस्ट शेअर करत सुबोध भावेनं आनंद व्यक्त केला. ‘साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक, अजून काय हवं? आयुष्य सार्थकी लागलं, लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार’, अशा शब्दांत सुबोधने आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी  त्यांचे आभार मानले आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive