By  
on  

या मराठी अभिनेत्रीच्या नखरेल अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा, बॉलिवूडमध्येही दाखवलीय आपल्या अभिनयाची चुणूक

गोड चेह-याच्या ह्या मराठी अभिनेत्रीने आपल्या सशक्त अभिनयाची चुणूक दाखवत तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या छोट्या पण लक्षवेधी भूमिकेतून रसिकांची मनं जिंकली. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच वैदही परशुरामी.

 

 

 

वैदेही परशुरामी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री.  'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील भूमिकेमुळे ती  चर्चेत आली. त्यातील तिच्या भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवा देखील तिने मिळवली. तर त्यानंतर लगेचच ती  'सिंबा' ह्या रोहीत शेट्टीच्या बॉलिवूड सिनेमात झळकली.

 

 

 

 

 

 

साध्या भोळ्या शिक्षिकेच्या रुपात 'सिंबा'मध्ये छोट्या पण लक्षवेधी भूमिकेतून वैदहीने बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला.  

 

 

 

 

 

नेहमीच सोशल मिडीयावर एक्टीव्ह असणारी वैदही आपले मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

 

 

 

 

हॉरर कॉमेडी जॉनर असलेला ‘झोंबिवली’ या आगामी मराठी सिनेमातून वैदही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमाचं शूटींग अनलॉकमध्ये सुरु झालं. यात वैदही अमेय वाघ आणि ललित प्रभाकर या कलाकारांसह स्क्रीन शेअर करतेय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुढील वर्षी म्हणजेच  2021 रोजी झोंबिवली हा हॉरर-कॉमेडी सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive