सध्या बोलबाला आहे तो वेबसिरीजचा. एक नवीन पण प्रभावी माध्यम म्हणून अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या प्लॅटफॉर्मवर अभिनयाचा कस आजमावत असतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे अतुल कुलकर्णी. अतुल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टातील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखलं जातो.
https://www.instagram.com/p/Bqr_zAvBhz2/?utm_source=ig_web_copy_link
अतुल आता ‘द सवाईकर केस’ या वेबसिरीजमधून सगळ्यांसमोर येत आहे. प्रख्यात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ही सिरीज दिग्दर्शित करत आहेत. वायाकॉम १८च्या वूट्च्या माध्यमातून ही सिरीज आपल्यासमोर येत आहे. ‘द सवाईकर केस’ या सिरीजची कथा गोव्यात घडते. ‘द सवाईकर केस’ बद्दल अतुल कुलकर्णी म्हणतात, हा अनुभव खुप छान आहे. एक कलाकार म्हणून प्रयोगशीत राहण्यासाठी असे प्रयोग गरजेचे असतात.