आपल्या आयुष्यात आठवणींना खास स्थान असतं. काही व्यक्तींच्या, काही वस्तूंच्या आठवणी आपल्यासाठी खुप खास असतात. सेलिब्रिटीही त्यांच्या खास आठवणी जपत असतात. दिग्दर्शक रवी जाधव यांनी अलीकडेच एक आठवण शेअर केली आहे. त्यांनी सोशल मिडियावर ९० च्या दशकातील स्कुटर बजाज चेतकचा फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. या पोस्ट्च्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘चांगल्या आठवणी कितीही जुन्या झाल्या तरी त्यांना भंगारात टाकायच्या नसतात... त्या हृदयात सजवून आयुष्यभर जपायच्या असतात. मी माझ्या वडिलांची १९८० ची स्कूटर (बजाज चेतक) अशीच सजून धजून माझ्या घरी जपली आली. मला प्रेरणा द्यायला. सतत माझ्या सोबत रहायला.’
https://www.instagram.com/p/BuLR4cdlaoQ/?utm_source=ig_web_copy_link
रवी यांनी या स्कुटरद्वारे जणू वडिलांची आठवण जपली आहे. रवी सध्या ‘रंपाट’ या सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहेत. या सिनेमाविषयी काहीच माहिती समोर न आल्याने रसिकांना उत्सुकता आहे.