By  
on  

मराठी मालिकेच्या या वहिनीसाहेबांनी दिली ‘गुडन्युज’, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

 ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेतील नंदिता गायकवाड या भूमिकेने धनश्रीला घरघरात पोहोचवलं. तिची स्टाईल, खलनायिकेच्या लूकमधील जरब प्रेक्षकांना खास आवडली.

 

 

पण आता धनश्रीने चाहत्यांशी खास बातमी शेअर केली आहे. धनश्रीने तिचा बेबी बम्प फ्लाँट करणारा व्हिडियो शेअर केला आहे.  पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने आई होणार असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे. ही गोड बातमी शेअर करण्याचा अंदाज चाहत्यांना खुपच आवडला आहे. धनश्रीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive