By  
on  

नवराई शर्मिष्ठाला मिळाल्या या खास गिफ्ट, पाहा तिच्या चेह-यावरचा आनंद

मराठी बिग बॉस, हे मन बावरे या मालिकेमधून स्वत:ची खास ओळख निर्माण केलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तेजस देसाईसोबत आज लग्नाच्या बेडीत अडकते आहे. कालच तिचा हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी तिने पिंक टॉप आणि येलो स्कर्ट परिधान केला होता तर पती तेजस येलो कुर्त्यामध्ये दिसतो आहे.  

 

 

शर्मिष्ठा आणखी एका कारणामुळे खास खुष आहे. ते म्हणजे मिळालेल्या गिफ्ट्स. शर्मिष्ठाने वंदना गुप्ते आणि खास मैत्रिण मेघा धाडे यांनी दिलेल्या गिफ्ट्सचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive