By  
on  

ट्रोल करणा-यांना अपुर्वा नेमळेकरने दिलं सडेतोड उत्तर

 ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत शेवंता फेम अपुर्वा नेमळेकरचा हटके लूक दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेमध्ये अपुर्वा पम्मीच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसते आहे.  काहीशी मादक अशी अपुर्वाची नवी व्यक्तिरेखा आहे. तिच्या या नव्या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. पण काहींनी मात्र तिला ट्रोल केलं. त्यावेळी अपुर्वाने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

सगळ्या सिरीअलमध्ये तुम्हाला बाहेरवालीचाच रोल का देतात? असा प्रश्न एका युजरने अपुर्वाला विचारला होता. पण अपुर्वाने युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘या सीरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?” असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद केली आहे. तसेच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील नावावर निशाणा साधत अपूर्वा म्हणाली की “आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना.’ तिच्या या उत्तराचं चाहते कौतुक करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive