By  
on  

अबब ! अमोल कोल्हेंकडे आहेत १२५ तलवारी, पाहा ते काय करतात याचं

छत्रपती संभाजी या ही मराठीवरील मालिकेने अल्पावधीतच मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील मुख्य म्हणजेच संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाचीदेखील खुप तारीफ केली जात आहे.

अमोल यांच्याबद्दल जाणून घेण्याची रसिकांना कायमच उत्सुकता असते. डॉ. अमोल कोल्हे यांना अनेक कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. अशा कार्यक्रमात भेट म्हणून मिळवलेल्या जवळपास १२५ तलवारी अमोल यांच्याकडे आहेत. या तलवारींशी खास नातं असल्याचंही अमोल सांगतात.

डॉ.अमोल कोल्हे यांना ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेदरम्यानही रसिकांचं इतकंच प्रेम मिळालं होतं. या कार्यक्रमादरम्यान मिळालेल्या तलवारींपैकी त्यांनी दोनच स्वत:जवळ ठेवलेल्या आहेत. इतर तलवारी ते टीमधील लोकांना देत असतात.

या भेटीबद्द्ल अमोल कोल्हे म्हणतात, ‘शिवाजी आणि संभाजी राजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. पण हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही तर सगळ्या टीमचा आहे. त्यामुळे या तलवारींवर त्यांचाही हक्क तितकाच आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive