मंतरेलेल्या घरात जायचं आहे का? झी वाहिनी पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यास सज्ज

By  
on  

सध्या भयपटांना चांगले दिवस आले आहेत. भयपटांचा थरार रसिकांसमोर आणण्यात झी वाहिनीचा हात कुणीही धरु शकत नाही. त्यामुळेच ‘रात्रीस खेळ चाले’ च्या यशानंतर झी युवावर आणखी एक भयपट रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. झी युवावर ‘एक घर मंतरलेलं’ ही भयमालिका ४ तारखेपासून सुरु होत आहे.

https://twitter.com/Zee_Yuva/status/1099564116933517312

या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेत्री सुरुची आडारकर पहिल्यांदाच एखाद्या भयमालिकेत दिसणार आहे. या प्रोमोमध्ये सुरुची एखाद्या जुन्या पण एकाकी घरात पाऊल ठेवताना दिसत आहे. या घरातील ‘वाचवा ! वाचवा !!’ अशी हाक ऐकून सुरुची माडीवर जाते. त्यानंतर तिच्यासोबत जे काही घडते त्यावरून या मालिकेतील थरारकतेचा अंदाज येऊ शकतो. ही मालिका ४ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३०ला झी युवावर प्रसारित होणार आहे.

Recommended

Loading...
Share