By  
on  

सुरुचीसोबत सुयश टिळकही दिसणार ‘मंतरलेल्या घरात’, का रे दुरावानंतर पुन्हा एकत्र

झी युवा रसिकांसमोर एक नवी भयमालिका घेऊन येत आहे हे आम्ही यापुर्वीच सांगितलं आहे. या मालिकेत सुरुची आडारकर असणार हे यापुर्वीच स्पष्ट झालं आहे. पण सुरुचीसोबत या मलिकेत सुयश टिळक झळकणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

https://www.instagram.com/p/BuV5r6YBtDZ/?utm_source=ig_web_copy_link

सुयशने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये या मालिकेत तो दिसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एक घर मंतरलेलं या मालिलेचा प्रोमो रिलीज झाला असून एका लहान बाळाच्या हसण्याभोवती या मालिकेच्या भयाचं सुत्र फिरत राहतं. या मालिकेच्या मुख्य प्रोमोमध्ये सुरुची एखाद्या जुन्या पण एकाकी घरात पाऊल ठेवताना दिसत आहे. या घरातील ‘वाचवा ! वाचवा !!’ अशी हाक ऐकून सुरुची माडीवर जाते. पण त्यांनंतर असं काही घडतं की पाहताना मनाचा थरकाप उडतो. सुयश अणि सुरुचीही जोडी प्रेक्षकांना घाबरवण्यात कितपत यशस्वी होते ते लवकरच कळेल. ही मालिका ४ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३०ला झी युवावर प्रसारित होणार आहे.

https://twitter.com/Zee_Yuva/status/1099564116933517312

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive