ह्या नव्या भूमिकेतून हॅण्डसम हंक गश्मिर महाजनी येतोय प्रेक्षकांसमोर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचा हॅणड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच नवनव्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांसमोर येत असतो. अभिनयाप्रमाणेच डान्सवरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. लवकरच गश्मिर एका नव्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाला आहे.

माधव दाते ही व्यक्तिरेखा गश्मिर आपल्या आगामी प्रोजोक्टसाठी साकारतो आहे. विशेष म्हणजे तो ह्यात तो वर्क फ्रॉम होम वडील आणि पतीच्या भूमिकेत दिसणार. त्यामुळे साहजिकच तो किचनमध्ये काम करताना पाहायला मिळतोय. खुपच इंटरेस्टिंग असलेली भूमिका एखाद्या सिनेमाची आहे की वेबसिरीजची ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण गश्मीरच्या या पोस्टनंत चाहत्यंमध्ये मात्र कमालीची उत्सुकता वाढली आहे. त्याची ही आगामी कलाकृती लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लवकरच.... Coming soon #newnormal

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

 

लॉकडाऊनपूर्वी गश्मीर महाजनीचा पूजा सावंतसोबत बोनस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसंच प्रवीण तरडे दिग्दर्शित ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही गश्मीर झळकतोय. त्यात आता ह्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 

Recommended

Loading...
Share