By  
on  

सोनाली कुलकर्णीच्या वॉर्डरोबमध्ये आहे ही खास गोष्ट, पाहा काय म्हणते ती त्याबद्दल

भारतीय स्त्रीची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे तिचा पेहराव. साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा सगळ्यात जवळचा पेहराव आहे. अशा वेळी अभिनेत्रीदेखील या पेहरावाच्या मोहात पडल्या तर नवल नाही. स्त्रियांकडे साड्यांचं कितीही मोठं कलेक्शन असलं तरी एखादी साडी तिच्या खास जवळची साडी असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या जवळही अशीच एक खास साडी आहे. तिच्या या खास साडीचा फोटो नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BuTz5YKASPX/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत सोनालीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. ही साडी तिच्यासाठी खुप खास आहे कारण ही साडी आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांची. ही साडी सोनालीला स्मिता यांची बहीण अनिता यांनी भेट दिली आहे. सोनालीने या साडीतील फोटो शेअर करत ही साडी तिच्यासाठी सगळ्यात खास असल्याचं सांगितलं आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive